Turmeric Processing : हळदीपासून कोणकोणते मुल्यवर्धीत पदार्थ तयार होतात?

Team Agrowon

हळद पावडर तयार करण्यासाठी प्रथम जाड, मोठ्या हाळकुंडाचा इलेक्ट्रिक मोटर चालणाऱ्या चक्की किंवा मशीनमध्ये भरडा केला जातो. या भरड्यापासून हळद पावडर तयार केली जाते.

Turmeric Processing | Agrowon

हळद ही मुळातच औषधी व गुणकारी असल्यामुळे तिच्यापासून सुगंधी तेल काढता येते. हळदीच्या ताज्या गड्ड्यापासून पाच ते सहा टक्के तेल मिळते. हे तेल नारंगी पिवळ्या रंगाचे व हळदी सारखा वास असणारे असते.

Turmeric Processing | Agrowon

सौंदर्यप्रसाधने तयार करण्यासाठी ज्या आयुर्वेदिक वनस्पतींचे लागवड उपयुक्त ठरते त्यामध्ये हळदीचा सिंहाचा वाटा आहे. वेगवेगळ्या सौंदर्य प्रसाधनांमध्ये तसेच साबणामध्ये हळदीच्या गुणधर्माचा उपयोग केलेला आढळतो.

Turmeric Processing | Agrowon

हळदीचे गड्डे मुख्यतः कुंकू तयार करण्यासाठी वापरतात. त्यामध्ये टॅपीओका आणि पांढऱ्या चीकनमातीचे खडे मिसळतात आणि त्यावर सल्फ्युरिक ऍसिड व बोरिक ऍसिडची प्रक्रिया करतात. हे मिश्रण वाळवून दळतात.

Turmeric Processing | Agrowon

वाळलेल्या हळद पावडर पासून कुरकुमीन नावाचा घटक वेगळा काढता येतो. हळदीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण जातीनुसार दोन ते सहा टक्के असते. हळदीपासून अनेक आयुर्वेदिक औषधे तसेच सौंदर्यप्रसाधने बनविता येतात.

Turmeric Processing | Agrowon

लोकरी, रेशमी, सुती कपड्यांना पिवळा रंग देण्यासाठी हळदीचा उपयोग करतात. सध्या काही प्रमाणात सुती कपड्यांना हळदीचा रंग देतात. औषधे, कॉन्फेक्शनरी उद्योगात हळदीचा रंगासाठी उपयोग होतो.

Turmeric Processing | Agrowon
Sugarcane Trash | Agrowon
आणखी पाहा...