Team Agrowon
कापसाचे योग्य वाण निवडताना सर्वात महत्वाच म्हणजे बीटी वाण रसशोषक किडींना सहनशील असावं जेणेकरुन कीड व्यवस्थापनावरील खर्च कमी करता येईल.
कोरडवाहू लागवडीसाठी कापसाचे बीटी वाण पाण्याचा ताण सहन करणारे असावे.
सघन लागवडीसाठी आटोपशीर ठेवण, उंची व फांद्यांची लांबी कमी असणारे कापसाचे वाण निवडावे.
निवडलेले वाण आपल्या भागामध्ये अधिक उत्पादन देणारं असाव.
कोरडवाहू लागवडीसाठी बीटी कपाशीचे वाण कमी कालावधीचे म्हणजेच १४० ते १५० दिवसात तयार होणारे असावे. मध्यम कालावधीचे म्हणजेच १५० ते १६० दिवस कालावधीचे असावे. तर बागायती लागवडीसाठी बीटी वाणाचा कालावधी १६० ते १८० दिवसांचा असावा.
कपसाच्या बोंडाचा आकार कोरडवाहूसाठी मध्यम म्हणजेच ३ ते ४ ग्रॅम तर बागायतीसाठी मोठा म्हणजेच ४ ग्रॅम असावा.
वाणाच्या धाग्याचे गुणधर्म सरस असावेत.