Team Agrowon
मुक्त संचार गोठा तयार करताना एकूण उपलब्ध जागेपैकी एक तृतीयांश जागेवर गोठा बांधून उर्वरित जागा मोकळी सोडली जाते.
चारी बाजुंनी कमी खर्चात उपलब्ध सामग्रीचा वापर करून कुंपण केले जाते. जनावरांचे दूध काढताना, औषधउपचार व कृत्रिम रेतनाची वेळ वगळता इतर पूर्ण वेळ मुक्त असतात.
एका गायी/ म्हशीला मुक्त संचार गोठ्यामध्ये कमीत कमी २०० चौरस मीटर जागा लागते.
म्हणजे १ गुंठा जागेत आपण ५ जनावरे मोकळी सोडू शकतो. गोठयातील गव्हाणीत चारा घालण्याची सोय असते, तर पाण्यासाठी मोकळ्या जागेत हौद बांधून पिण्याच्या पाण्याची सोय केलेली असते.
संशोधनाअंती मुक्त संचार गोठा पद्धतीत गायी/ म्हशींच्या दूध (Milk) उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून आले. तसेच प्रजननातही सातत्य दिसून आले.
बंदिस्त गोठ्यात जाणवणाऱ्या समस्यांचा विचार करता मुक्त संचार गोठा प्रभावी ठरत आहे. जागेची अडचण नसल्यास मुक्त गोठ्यात परिस्थितीनुसार बदल करता येतात. जुन्या गोठ्याचे रुपांतर मुक्त गोठ्यात अगदी सहजरीत्या करता येते.