Poultry Shed : पर्यावरण नियंत्रित पोल्ट्री शेड कसे असावे?

Team Agrowon

पोल्ट्री शेडचे बांधकाम

पोल्ट्री शेडचे बांधकाम पूर्वेकडून पश्चिमेकडे केले जाते. पूर्वेकडून कुलिंग पॅड, पश्‍चिमेकडून मोठे एक्झॉस्ट पंखे लावले जातात. अशा शेडमध्ये स्वयंचलित खाद्य आणि पाण्याची व्यवस्था करावी लागते.

Poultry Shed | Agrowon

कोंबडीसाठी जागा

साधारणतः ईसी शेडमध्ये एका कोंबडीसाठी ०.७० चौरस फूट एवढी जागा लागते. त्यानुसार जागेचे नियोजन करावे लागते. १०,००० कोंबड्यांसाठी ७,००० चौरस फूट एवढी जागा लागते.

Poultry Shed | Agrowon

योग्य तापमान

कोंबडीच्या योग्य वाढीसाठी योग्य तापमान राखणे हे फायदेशीर व्यवसायाची गुरुकिल्ली आहे. कोंबडीला शरीर तापमान नियंत्रण क्षमता गाठण्यासाठी साधारणपणे १४ दिवसांचा कालावधी लागतो. या काळात शेडमधील तापमान ही स्थिर राहील याची काळजी घेणे गरजेचे असते.

Poultry Shed | Agrowon

विविध प्रकारच्या हीटर्सचा वापर

थंडीच्या काळात पोल्ट्री शेड गरम करण्यासाठी नैसर्गिक वायू , रेडियंट हीटर्स, पॅनकेक हीटर्स व ट्यूब हीटर्स अशा विविध प्रकारच्या हीटर्सचा वापर केला जातो.

Poultry Shed | Agrowon

वायुविजन यंत्रणा

वायुविजन यंत्रणा ही ताजी हवा शेडमध्ये वितरित करण्यासाठी काम करते. सर्व पोल्ट्री शेडमध्ये अतिरिक्त उष्णता, अमोनिया, कार्बन डायऑक्साइड, इतर वायू आणि धूळ बाहेर टाकण्यासाठी; त्याचबरोबर ऑक्सिजनचा पुरवठा सुनिश्‍चित करण्यासाठी वायुविजन आवश्यक आहे. यामध्ये एक्झॉस्ट पंखे व कूलिंग पॅड, कंट्रोलर काम करतात.

Poultry Shed | Agrowon

कूलिंग प्रणाली

जेव्हा तापमान हे २९.४ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होते तेव्हा कोंबड्यांना आरामदायी वातावरण देण्यासाठी कूलिंग प्रणाली आवश्यक असते.

Poultry Shed | Agrowon

इलेक्ट्रिक कंट्रोलर

ईसी शेड चे व्यवस्थापन हे इलेक्ट्रिक कंट्रोलरवर अवलंबून असते. कंट्रोलरच्या मदतीने आपण बाहेरील तापमानाच्या विपरीत शेडमधील तापमान योग्य त्या अंशावर ठेवू शकतो. यामुळे कोंबड्यांना आरामदायी ठेवणे शक्य होते. यामुळे शरीर उबदार किंवा थंड राखण्यासाठी त्यांची ऊर्जा खर्च होत नाही.

Poultry Diseases | Agrowon
PM Kisan | Agrowon