Team Agrowon
रेशीम उदयोगासाठी पक्कया संगोपनागृहाची आवश्यकता असताना देशातील ८० टक्के शेतकरी मात्र कच्च्या शेड नेट किंवा संगोपनगृहात रेशीम उदयोग करतात.
देशात अल्पभुधारक शेतकऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे पक्के किटकसंगोपन गृह बांधणीसाठी आर्थिक गुंतवणूक करणे त्यांना शक्य होत नाही.
रेशीम किटक संगोपनागृहात २२ ते २८ अंश सेल्सीअस तापमान व ८० ते ८५ टक्के सापेक्ष आर्द्रता ठेवणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रात कच्च्या शेडनेट मध्ये पावसाळा व हिवाळा या ऋतुतील ८ महिनेच हा उदयोग करणे शक्य आहे. कारण कच्च्या शेडमध्ये रेशीम किटक वाढीसाठी आवश्यक तापमान व सापेक्ष आर्द्रता नियंत्रीत करणे शक्य होत नाही.
रेशीम किटक तुती पाने खात नाहीत. त्याचा सरळ परिणाम किटकाच्या वाढीवर होऊन रेशीम कोष उत्पादनात घट होते. तुती लागवड क्षेत्रानुसार किटक संगोपन गृहाचे बांधकाम होणे आवश्यक आहे.
रेशीम किटक संगोपनागृहात २२ ते २८ अंश सेल्सीअस तापमान व ८० ते ८५ टक्के सापेक्ष आर्द्रता ठेवणे आवश्यक आहे.