Team Agrowon
आंबा फळगळ टाळण्यासाठी फळांना पेपर बॅग लावणे, झाडांना वेळीच गरजेनुसार पाणी देणे व बुध्यांत मल्चिंग करणे असे प्रभावी उपाय केले पाहिजेत.
तापमान किती आहे, यावर लक्ष ठेवण्यासाठी बागेत थर्मामीटर बसवावा.
तापमान ३५ अंश सेल्सिअसवर गेले की त्यावर उपाय कराव्यात.
सध्या उष्मा लवकर जाणवू लागल्याने भविष्यात पारा दोन अंश अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे फळगळीची शक्यता आहे.
तसंच फुलकीडाचा प्रादुर्भाव समुद्रकिनारी बागांमध्ये दिसतो. फळ चिकूच्या आकारासारखे होते.
फुलकिडीची नियंत्रणासाठीची औषधे महाग आहेत. त्यामुळे बागायतदारांनी गरजेनुसार औषधे वापरावीत.
झाडावरील फवारणीबरोबर जमिनीत कीटकनाशके टाकल्यास अधिक प्रभाव पडतो.
फळमाशी आणि तुडतुडा नियंत्रणासाठी कृषी विद्यापीठाने दिलेल्या वेळापत्रकानुसार नियोजन करावे.