Team Agrowon
रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये त्यांच्या ओटीपोटातील उपयोगी जिवाणूंसाठी चांगल्या वातावरणाची निर्मिती पाणी करते.
पाणी हे शरीरातील महत्त्वाचे द्रवरूपी माध्यम आहे. ज्यामुळे पेशीतील आणि पेशी बाहेरील रासायनिक क्रिया सहज शक्य होतात.
शारीरिक तापमानाचे नियमन करण्यासाठी देखील पाण्याची आवश्यकता असते. कारण पाण्याचा उष्मांक जास्त असल्यामुळे ते जास्त उष्णता ग्रहण करून कमीत कमी शारीरिक तापमान वाढ होते
पाण्याची उष्णता वहन क्षमता जास्त असल्यामुळे ऊर्जा स्रोतापासून उष्णता लवकर संपूर्ण शरीरभर पसरविण्यास पाणी मदत करते. महत्त्वाचे म्हणजे पाणी मलमूत्र रूपात किंवा घामाच्या रूपात आंतरिक ऊर्जा बाहेर टाकण्यासाठी मदत करते.
शरीरातील द्रवामधील हायड्रोजन आयनचे प्रमाण अर्थात पोषक आम्ल अंश किंवा अल्कली अंश सुयोग्य राखते.
शरीरातील महत्त्वाचे अवयव घर्षणामुळे किंवा कोरडे पडल्यामुळे खराब होऊ नयेत म्हणून पाणी वंगणासारखे देखील कार्य करते. जसे की, सांध्यामध्ये हाडांची पुढच्या तेलकट वंगण वजा स्त्राव स्त्रवते ज्यास सायनोव्हिअल फ्लुइड म्हणतात.