Team Agrowon
भेंडी पिकाला उष्ण व दमट हवामान चांगले मानवते.भेंडीवर तापमानाचा विशेष प्रभाव होतो. त्यासाठी योग्य तापमानात भेंडीची लागवड करणे गरजेचे असते.
१५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाचा उगवणीवर परिणाम होतो.
समशितोष्ण व भरपूर सूर्यप्रकाश असलेले हवामान पिकास उपयुक्त ठरते.
जास्त थंडी अधिक काळ असणाऱ्या ठिकाणीहे पीक घेता येत नाही. अतिशय दमट वातावरणामध्ये भुरी रोगाचा उपद्रव आढळतो.
तापमान ४२ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असल्यास फुलांची गळ होते.
तापमान २० ते ४० अंश सेल्सिअस दरम्यान असल्यास, बियांची उगवण, झाडाची योग्य वाढ होऊन फूलगळ कमी होते.