Team Agrowon
बाजारात लाल मिरचीचे भाव कमी झाले आहेत. बाजारात नवे पीक दाखल होण्यामुळे दरावर दबाव आला.
मिरचीचे भाव क्विंटलमागे जवळपास ५ हजाराने कमी झाले. तसं पाहीलं तर यंदा लाल मिरचीचे पीक कमी आहे.
देशभरातील शेतकरी याची पुष्टी करत आहेत.
पण बाजारात आवक वाढणार या शक्यतेमुळे आणि मागणी कमी असल्यामुळे लाल मिरचीचे भाव कमी झाले.
सध्या लाल मिरचीला १८ हजार ते २५ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये वाढत जाणार आहे.
त्यामळे भावावरील दबाव कायम राहू शकतो, असा अंदाज आहे.