Soybean Market : अर्जेंटीनाचं सोयाबीन उत्पादकांसाठी काय आहे धोरण?

Team Agrowon

धोरण काय?

अर्जेंटीनाच्या सोयाडाॅलर पाॅलिसीमुळं आंतरराष्ट्रीय बाजारावर दबाव आहे. पण अर्जेंटीनातील शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणार आहे. त्यामुळं येथील शेतकरी सोयाबीन विक्री वाढवत आहेत.

Soybean Market | Agrowon

अर्जेंटीना आपल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पाॅलिसी राबवत आहे. तर भारत सरकारच्या पाॅलिसीमुळे सोयाबीनवर दबाव आहे.

Soybean Market | Agrowon

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरावर अर्जेंटीनाच्या सोयाडाॅलर धोरणाचा परिणाम झाला. अर्जेंटीनाने सोयाडाॅलर धोरण जाहीर केल्यानंतर सोयाबीन आणि सोयापेंडचे दर नरमले.

Soybean Market | Agrowon

अर्जेंटीना सोयापेंड आणि सोयातेल निर्यातीत आघाडीवर आहे.

Soybean Market | Agrowon

सोयाडाॅलर धोरणामुळे अर्जेंटीनातील शेतकरी स्टाॅक बाहेर काढत आहेत. यंदा अर्जेंटीनात सोयाबीन उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. त्यामुळं अर्जेंटीनात दर सुधारले आहेत.

Soybean Market | Agrowon

शेतकऱ्यांना आणखी दरवाढीची अपेक्षा आहे. परिणामी शेतकऱ्यांनी सोयाबीन मागे ठेवलं. शेतकऱ्यांनी सोयाबीन मागं ठेवल्यानं बाजारात टंचाई होती.

Soybean Market | Agrowon

देशातून सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेल निर्यात वाढावी, यासाठी अर्जेंटीना सरकारने शेतकऱ्यांसाठी ३०० पेसो प्रतिडाॅलर एक्सचेंज रेट जाहीर केला. पेसो हे अर्जेंटीनाचे चलन आहे.

Soybean Market | Agrowon

सरकारने शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी जवळपास १९१ पेसो जास्त रेट दिला. म्हणजेच शेतकऱ्यांना जास्त दर मिळणार. तर वरचा भार अर्जेंटीना सरकार उचलणार आहे.

Soybean Market | Agrowon
White Onion | Agrowon