Anuradha Vipat
जड अन्न पचनास जास्त वेळ लागतो, त्यामुळे ते पोटांमध्ये बराच वेळ राहते, ज्यामुळे अपचन होऊ शकते.
रात्रीच्या वेळी जड अन्न खाल्ल्याने ऍसिड रिफ्लक्स होऊ शकतो, ज्यामुळे छातीत जळजळ होण्याची शक्यता वाढते.
पचनास त्रास होत असल्याने झोप पूर्ण होत नाही आणि त्यामुळे अस्वस्थ वाटू शकते.
रात्रीच्या वेळी जड अन्न खाल्ल्याने कॅलरीज बर्न न झाल्यामुळे वजन वाढू शकते.
जड अन्न पचनासाठी शरीराला जास्त ऊर्जा लागते, ज्यामुळे पचनक्रियेवर ताण येतो.
जड अन्न पचनास जास्त वेळ लागत असल्याने बद्धकोष्ठतेची समस्या देखील येऊ शकते.
जड अन्न खाल्ल्याने झोप पूर्ण न झाल्यामुळे दिवसभर थकवा जाणवू शकतो.