Team Agrowon
उन्हाळ्यामध्ये जनावरांचे कोरडा चारा खाण्याचे प्रमाण उत्तम राहण्यासाठी वारंवार थोडा-थोडा चारा खाण्यास द्यावा.
उच्च प्रतीच्या चारापिकांचा आहारात समावेश करावा. आहारात सर्व घटक योग्य प्रमाणात आहेत का? हे पहावे.
चारा खाण्याचे प्रमाण कमी असल्यास आहारातील पोषणतत्वांची घनता वाढवावी.
आहारातील पोषणतत्वांची घनता वाढल्यामुळे कमी चाऱ्यातून जनावरांना त्यांच्या शारीरिक गरजेनुसार पोषणतत्त्वे उपलब्ध होतील.
जनावरांच्या आहारात केवळ वाळलेल्या चाऱ्याचा वापर करू नये.
उन्हाळ्यात आहारातील चाऱ्याचे प्रमाण कमी ठेवून पशुखाद्य किंवा खुराक वाढवून देणे हा सर्वसाधारण पर्याय आहे. यामुळे आहारातील तंतुमय पदार्थाचे प्रमाण कमी असल्यामुळे शुष्क पदार्थ खाण्याचे प्रमाणात वाढ होईल.