Paryushan Parv 2023: चुकाचं प्रायश्चित, त्यागाचा सण म्हणजे पर्युषण पर्व नेमकं काय ?

Sanjana Hebbalkar

सण

आपल्या भारतात अनेक प्रकारचे सण साजरे केले जातात. प्रत्येक सणामागं काहीतरी कारण असतं त्याच प्रमाणे जैन समाजात देखील एक सण साजरा केला जातो.

Paryushan Parv 2023 | Agrowon

पर्युषण पर्व

पर्युषण पर्व असं त्या सणाचं नाव असून १२ सप्टेंबर ते २० सप्टेंबर हा सण सध्या जैन धर्मातील लोक साजरा करत आहेत.

Paryushan Parv 2023 | Agrowon

जैनधर्मीयांसाठी महत्त्वाचा सण

हे पर्व जैनधर्मीयांसाठी महत्त्वाचं आणि पवित्र मानलं जातं. यामध्ये या  सणादरम्यान लोक एकमेकांना अध्यात्माचा मार्ग अवलंबण्यासाठी प्रोत्साहित करतात. या सणाला क्षमापर्व असेही म्हणतात.

Paryushan Parv 2023 | Agrowon

महावीर यांच्या तत्त्वावर चालणारं

जैन समाज हा महावीर आणि जैन तीर्थकार यांच्या तत्त्वावर चालणार आहे. या पर्वाला जैन समाजात अतिशय महत्त्वाचं स्थान दिलं जातं

Paryushan Parv 2023 | Agrowon

मिच्छामि दुक्कडम

मिच्छामि दुक्कडम ही जी प्रथा आहे ती प्रामुख्याने हा पर्वात वापरली जाते. याच कारण म्हणजे वर्षभरात आपल्याकडून कळत-नकळत ज्या चुका झाल्या आहेत त्यांच्या चुकीबद्दल माफी मागितली जाते. यावेळीच 'मिच्छामि दुक्कडम' असं म्हणतात.

Paryushan Parv 2023 | Agrowon

उपवास

या पर्वाच्या आठ दिवसांमध्ये उपवास देखील केले जातात. जैन बांधव आठ दिवस अन्न-पाण्याचा त्याग करतात त्याला वास म्हणलं जात. वेगवेगळ्या प्रकारचे उपवास केले जातात.

Paryushan Parv 2023 | Agrowon

त्याग

या आठ दिवसांमध्ये जैन समाज कंदमुळे, कांदा-लसूण, पालेभाजी या गोष्टीचा त्याग केला जातो. याचदरम्यान गुरु महाराज यांच प्रवचन, कार्यक्रम देखील आयोजन केलं जातं.

Paryushan Parv 2023 | Agrowon

आत्माशुद्धीचा पर्व

आत्माशुद्धी हा या पर्युषण पर्वाचा मुख्य उद्देश्य असतो. या सणाची सांगता सवत्सरीमध्ये केली जाते.जिथे सर्व जैन बंधु एकत्र येतात.

Paryushan Parv 2023 | Agrowon
Paryushan Parv 2023 | Agrowon
आणखी वाचा.....