Samruddhi Accident : समृद्धी महामार्गावर नेमके अपघात कशामुळे घडतात?

Swapnil Shinde

भीषण अपघात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्वाकांक्षी समृध्दी महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्री बुलढाण्यात झालेल्या एका खासगी बसचा अपघातात 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला

Buldhana Accident | agrowon

४०० हून अपघात

७०० किमी लांबीच्या समृद्धी महामार्गावर गेल्या या ६ महिन्यांतच ४०० हून अधिक अपघात झाले असून, यात ८० जणांना प्राण गमवावे लागले आहेत.

Buldhana Accident | agrowon

सुरक्षिततेचा मुद्दा

समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाल्यापासून दुर्घटनांचे सत्र सुरूच असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा प्रकर्षानं ऐरणीवर आला आहे.

Samruddhi Highway | agrowon

डुलकी लागल्याने

महामार्ग पोलिसांनी या अपघातांमागील कारणे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये सर्वाधिक अपघात डुलकी लागल्याने झाले

Samruddhi Highway | agrowon

अतिवेग

त्यानंतर अपघात हे अतिवेग यामुळे घर्षण होऊन टायरफुटीच्या घटना घडत असल्याचे म्हटले जात आहे.

Samruddhi Highway | agrowon

मन बधीर

महामार्गावर दूरपर्यंत काही वेगळे दिसतच नसल्याने चालकाचे मन बधीर होते. त्याला रोड हिप्नोसिस’ म्हणतात.

Samruddhi Highway | agrowon

विश्रांती थांबे

या महामार्गावर अद्याप विश्रांती थांबे नसल्याने सलग प्रवास करून वाहन चालक थकल्याने अपघात घडले आहेत.

Samruddhi Highway | agrowon

अपघातानंतर मदत

पोलिस चौक्या बांधण्यात न आल्याने अपघातानंतर लगेच मदत मिळत नाही.

Samruddhi Highway
Shinde-Fadnavis Govt | agrowon