Tur Sowing: तूर लागवड करताना काय काळजी घ्याल?

Team Agrowon

कडधान्य पीक

महाराष्ट्रात खरीप हंगामात तूर हे प्रमुख कडधान्य पीक आहे. तुरीची पेरणी वेळेवर म्हणजे ३० जूनपर्यंत होणे आवश्यक असते.

Tur Sowing | Agrowon

पेरणी कालावधी

पेरणी जसजशी उशिरा होईल त्याप्रमाणे उत्पादनात घट येते. यासाठी जास्तीत जास्त ७ जुलैपूर्वी पेरणी करावी, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.

Tur Sowing | Agrowon

जमिनीची निवड

तूर लागवडीसाठी मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन असावी. चोपण क्षारयुक्त जमीन तुरीला मानवत नाही.

Tur Sowing | Agrowon

काडीकचरा वेचणी

शेवटच्या कुळवणीच्यावेळी हेक्टरी १५ ते २० गाड्या चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून काडीकचरा वेचून जमीन पेरणीसाठी तयार करावी.

Tur Sowing | Agrowon

तुरीची पेरणी

समाधानकारक पाऊस पडल्यानंतर वाफसा येताच कुळवणी करावी त्यानंतरच योग्य ओल असताना तुरीची पेरणी करावी.

Tur Sowing | Agrowon

वाणांची पेरणी

लवकर तयार होणाऱ्या वाणांची पेरणी ४५ बाय १० सेंमी अंतरावर करावी. मध्यम कालावधीच्या वाणांची पेरणी ६० बाय २० सेंमी. किंवा ९० बाय २० सेंमी अंतरावर करावी.

Tur Sowing | Agrowon
Shewaga | Agrowon