Team Agrowon
उन्हाळी सूर्यफूल लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी. उन्हाळी हंगामातील लागवड जानेवारीचा शेवटचा आठवडा ते फेब्रुवारीचा पहिला आठवडा यादरम्यान पूर्ण करावी.
पिवळ्या रंगाच्या आकर्षक टपोरे सूर्यफूल या पिकाचा मूलस्थान हे दक्षिण अमेरिकेमध्ये, त्यातही मेक्सिकोमध्ये झाला असल्याचे मानले जाते.सूर्यफूल हे जागतिक पातळीवर तेलबिया पिकांतील तिसरे महत्त्वाचे पीक आहे.
भारतात कर्नाटक हे राज्य सूर्यफूल उत्पादनात अग्रेसर आहे. सूर्यफूल हे पीक महाराष्ट्रात वर्षभर घेतले जात असले तरी त्याचे उत्पादन रब्बी हंगामामध्ये अधिक मिळते.
महाराष्ट्रात प्रामुख्याने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, नगर तर विदर्भातील बुलडाणा व अमरावती या जिल्ह्यांत सूर्यफूल पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. जमीन पाण्याचा निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी.
सामू ६.५ ते ८.० असल्यास रोपांची वाढ चांगल्या प्रकारे होते. पूर्वमशागत जमिनीची खोल नांगरणी करून शेतातील काडीकचरा वेचून शेत स्वच्छ करावे. नांगरणीनंतर २-३ आडव्या-उभ्या कुळवाच्या पाळ्या घालाव्यात.
जमीन भुसभुशीत करावी. पूर्वमशागतीवेळीच ४ ते ५ गाड्या कुजलेले शेणखत मिसळावे. पेरणीवेळी जमिनीमध्ये चांगला ओलावा असणे गरजेचे आहे. कारण सूर्यफूल बियांच्या वरील आवरण जाड असून, त्यात पाणी हळू शोषले जाते.