Green House Set Up : हरितगृह उभारणीसाठी आवश्यक तांत्रिक बाबी कोणत्या?

Team Agrowon

हरितगृहामध्ये प्रामुख्याने स्टीलचा सांगाडा, आच्छादन साहित्य, पाणी जाण्यासाठी गटर व वायुविजन यंत्रणा; तसेच हवामान नियंत्रण यंत्रणा बसविलेल्या असतात.

Polyhouse Farming | Agrowon

खांबासाठी पक्का पाया घेतलेला असावा. खड्ड्याचा आकार १.५ बाय १.५ बाय २ फूट असावा. त्यात मधोमध फाउंडेशन पाईप पासून त्यात होल्ड फास्ट बार टाकून काँक्रीट भरावे. काँक्रीट भरताना सिमेंट, वाळू व खडीचे प्रमाण १:४:८ याप्रमाणे घ्यावे.

Green House Set Up | Agrowon

छताला ठेवण्यात येणारे व्हेट ०.८ ते १ मीटर उंचीचे असावे. व्हेंन्ट ची दिशा पूर्व किंवा उत्तर असावी. हरितगृहाच्या एका कंपार्टमेंटची रुंदी ८ मीटर पेक्षा जास्त नसावी.

Green House Set Up | Agrowon

दोन कंपार्टमेंट मध्ये छताच्या पॉलिथिन फिल्म वरील पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी जीआय पत्र्याचेच गटर असावे, छतासाठी लागणारी फिल्म अल्ट्राव्हायोलेट प्लास्टिकची असावी व त्याची जाडी 200 मायक्रॉन असावी.

Green House Set Up | Agrowon

फिल्म वापरताना इतर निकष मानांकन प्रमाणे असावेत. साधारणपणे एक किलो फिल्ममध्ये ५.३ चौरस मीटर क्षेत्र अच्छादता येते.

Green House Set Up | Agrowon

फिल्मची पारदर्शकता उच्च दर्जाची ८० ते ८५ टक्के असावी. पॉलिथिन फिल्मची फिटिंग अल्युमिनियम चैनल पट्टीमध्ये जीआय स्प्रिंग च्या साह्याने करावी.

Green House Set Up | Agrowon

चारही बाजूने वायुविजन साठी ३ मीटर उंचीची जागा ठेवावी. ती रात्रीच्या वेळी कर्टनच्या साहाय्याने बंद करण्याची सोय ठेवावी.

Green House Set Up | Agrowon
BitterGourad | Agrowon
आणखी पाहा...