Team Agrowon
या रोगाच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनच्या पानाच्या मुख्य शिरेजवळ विखुरलेल्या अवस्थेत पिवळ्या रंगाचे चट्टे दिसतात.
पाने जसजशी परिपक्व होत जातात तस त्यावर गंजलेले तांबूस रंगाचे चट्टे दिसतात.
काही वेळा जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने अरुंद होतात व मुरगळतात. लहान अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास पूर्ण झाड पिवळे पडते.
अशा झाडांना कालांतराने फुले आणि शेंगा कमी लागतात. शेंगातील दाण्यांचा आकार लहान राहतो किंवा संपूर्ण शेंगा पोचट होतात त्यामुळे उत्पन्नात मोठी घट येते.
दाण्यांमधील तेलाचे प्रमाण घटते तर प्रथिनांच्या प्रमाणात वाढ होते.
हा विषाणू पानातील रसामार्फत पसरतो आणि हा प्रसार मुख्यतः पांढऱ्या माशी या रसशोषक किडीद्वारे केला जातो.
वेळीच या रोगाला ओळखून तसेच पांढऱ्या माशीचे नियंत्रण करून या रोगाचे व्यवस्थापन करावं लागत.