Team Agrowon
बाजारपेठ हीच मुख्य समस्या आहे. बाजारपेठ उपलब्ध असली तरी काही बड्या कंपन्या दर पाडण्याचे षड्यंत्र रचतात. त्याचा फटका स्मॉल होल्डर पोल्ट्री व्यवसायिकांना बसतो.
पक्ष्याचे २२०० ग्रॅम आणि त्यापुढील वजन हळूहळू वाढते. त्याला खाद्य अधिक लागते. यामध्ये पशुपालकाचे नुकसानच अधिक आहे.
आरोग्यविषयक समस्या दीड ते २२०० किलो वजनाच्या पक्ष्यांमध्ये कमी राहतात. परिणामी, याच वजनाचे पक्षी विकले जावे, याकरिता पोल्ट्री व्यावसायिकांनी देखील प्रयत्न आणि पाठपुरावा करणे अपेक्षित आहे.
मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचे संगोपन करणाऱ्या पोल्ट्री व्यावसायिकांचा विजेवरील खर्च लाखांत असतो.
गेल्या काही वर्षांत सोशल मीडियावरील अफवांमुळे पोल्ट्री व्यावसायिकांना मोठे नुकसान सोसावे लागले आहे.
एखाद्या राज्यात बर्ड फ्ल्यू बळावल्यानंतर लगेच महाराष्ट्रातही सोशल मीडियावर अफवांचे पेव फुटते. त्याआधारे घबराट निर्माण करून चिकनचे दर पाडण्याचे षड्यंत्र रचण्यात येते.