Team Agrowon
पाण्याची प्रत आणि जमिनीचा पोत या दोन्हीचा संयुक्तपणे विचार करूनच ओलीतासाठी पाण्याची योग्यता ठरवली जाते.
पाण्यातील क्षार, सोडियम व बोरॉनचे प्रमाण यावरून पाण्याची प्रत ठरवली जाते.
पाण्यातील क्षार, सोडियम व बोरॉनचे प्रमाण यावरून पाण्याची प्रत ठरवली जाते.
क्षारांचे प्रमाण ०.२५ डेसी सायमन प्रति लीटर पेक्षा कमी असल्यास पाण्याची प्रत ओलीतासाठी चांगली असते.
क्षारयुक्त पाण्याचा वापर करताना जमिनीला साधारण उतार द्यावा. उताराच्या दिशेने खोल नांगरट करावी. शेतात उताराच्या दिशेने योग्य मशागत करावी.
पिकांची लागवड वरंब्याच्या बगलेत करावी. पिकांमध्ये नियमित, वेळोवेळी उताराच्या दिशेने आंतरमशागत करावी.
tसेंद्रिय खतांचा तसेच हिरवळीच्या खतांचा जास्त प्रमाणात वापर करावा. रासायनिक खतांमध्ये नत्रयुक्त खतांचा शिफारशीपेक्षा २५ टक्के जास्त वापर करावा.