Tomato crop protection : अवकाळीमुळे टोमॅटो पिकावर काय परिणाम होतात?

Team Agrowon

भूरी रोगामुळे पानांखाली आणि वरील बाजूस पिठाप्रमाणे पांढऱ्या बुरशीची वाढ झालेली दिसते. पाने, फुले, फळांवर पांढऱ्या बुरशीची पावडर डागांच्या स्वरूपात दिसते. अशी पाने कालांतराने पिवळी होऊन वाळतात, गळून जातात.

Tomato crop protection | Agrowon

 राज्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसाचा टोमॅटो हंगामावर परिणाम झाला आहे. 

Tomato crop protection | Agrowon

शेतात पाणी साचून राहिल्याने अनेक ठिकाणी रोपांची मर झाली आहे. काही ठिकाणी फुलगळीसोबतच करपा, भूरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. 

Tomato crop protection | Agrowon

 पिकात पाणी साचून राहिल्याने झाडांच्या मुळ्यांची कार्यक्षमता कमी होऊन कीड, रोगांच्या प्रादुर्भाव वाढला आहे. 

Tomato crop protection | Agrowon

टोमॅटो रोपांवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास सुरुवातीला पानाचे देठ गळणे, शिरा रंगहीन होणे ही लक्षणे दिसतात. त्यानंतर झाडाची जुनी खालच्या बाजूची पाने पिवळी पडतात. नवीन पाने तपकरी होऊन कुजतात. त्यामुळे झाडांचा अन्नपुरवठा खंडित होतो. 

Tomato crop protection | Agrowon

टोमॅटोवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास झाडाची पाने पिवळी पडतात. झाडाच्या खोड, फांदीवर तपकिरी व काळपट रंगाचे ठिपके दिसून येतात.  

Tomato crop protection | Agrowon
Mango EMI | Agrowon