Team Agrowon
रंगसूत्रांमुळे आनुवंशिकतेचे गुणधर्म पुढील पिढीत संक्रमित होतात. यासाठी रंगसूत्रांचा अभ्यास महत्त्वाचा आहे. रंगसूत्रांतील वैगुण्य व आजार यांच्यामधील संबंधाचा अभ्यास केल्याने दोष लक्षात येतात. यासाठी प्रत्येक प्रजातीतील रंगसूत्रांचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे.
रंगसूत्रांतील विकृतीमुळे होणारे परिणाम, तसेच होणाऱ्या संततीचे लिंगनिदान व विकृती जाणून घेणे आवश्यक आहे. लैंगिक आणि अलैंगिक असे रंगसूत्रांचे प्रकार आहेत. उदा. गाईमध्ये रंगसूत्रांच्या एकूण ३० जोड्या असतात, एक जोडी लैंगिक रंगसूत्रांची आणि उर्वरित जोड्या अलैंगिक रंगसूत्रांच्या असतात.
यामध्ये रंगसूत्रांच्या एकूण संचातील क्रमांकात पटीने बदल होतो किंवा रंगसूत्रांतील संख्या कमी किंवा जास्त होते.
यामध्ये रंगसूत्रांत कपात होते. एकसारखी दोन रंगसूत्रे निर्माण होतात. काही वेळा अलैंगिक रंगसूत्रांतील विकृती दिसते.
नेहमीच्या रंगसूत्रांच्या जोडीखेरीज एक रंगसूत्र अधिक असते. यामध्ये प्रामुख्याने ट्रायसोमी-१३, ट्रायसोमी-१८ आणि ट्रायसोमी-२१ प्रकार आढळतात. ट्रायसोमी ही विकृती प्राण्यात प्राणघातक असते. यामुळे गर्भाच्या वाढीवर तीव्र परिणाम होतो.
या विकृतीमध्ये एकच लैंगिक रंगसूत्र असते.अशा विकृतीच्या प्राण्यांची लैंगिक वाढ खुंटलेली असते.
या नरांमध्ये मादीचे गुणधर्म अधिक असतात. सुपर फिमेल किंवा मेटा फिमेल लक्षणे (XXX) - असाधारण गुणधर्म, उंच सडपातळ असतात.