Team Agrowon
गीर गोवंशाचे संवर्धन विशेषत: गुजरात मधील भरवाड समुदाय करतो.
या गायीचे दूध घट्ट असते. या गाईंना कायम हिरवा आणि चांगला चारा लागतो.
शेपरूट गवतासह दादर ज्वारी गाईसाठी चांगले चारा पीक आहे. मक्क्याच्या तुलनेत हे पौष्टिक असून गायी चांगले दूध देतात
गीर गाईची दूध देण्याची क्षमता २०-२५ लिटर प्रतिदिन आहे.
भरवाड समुदायासाठी गीर गोवंश संपत्ती आहे. जैवविविधतेचा एक भाग असणाऱ्या गीर गोवंशातील उपजातींचे संवर्धन हा समाज चांगल्या प्रकारे करत आहे.
भरवाड समुदायाला मालधारी म्हटले जाते. माल म्हणजे पशू आणि पाळलेल्या पशूंना सांभाळणाऱ्या समुदायाला स्थानिक भाषेत मालधारी म्हणतात.
हा समुदाय समाजाबाहेरच्या लोकांना गाय विकत नाही. अनोळखी लोकांना गाई विकल्यास भविष्यात त्यांचे काय होईल, हे सांगता येत नाही.