Soybean Chlorosis : सोयाबीन पिवळे पडण्याची कारणे काय आहेत?

Team Agrowon

अतिवृष्टी

ज्या ठिकाणी वेळेवर आणि पेरणीयोग्य पाऊस पडलेला आहे अशा ठिकाणी सोयाबीन पीक सध्या रोपावस्थेत आहे. बऱ्याच ठिकणी सध्या अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे शेतात पाणी साठून राहण्याची शक्यता आहे. 

Soybean Chlorosis | Agrowon

पाण्याचा निचरा कमी होणाऱ्या व चुनखडीयुक्त जमिनी

कमी प्रमाणात पाण्याचा निचरा होणाऱ्या  चुनखडीयुक्त जमिनीत सोयाबीन पिवळे पडण्याची शक्यता आहे. 

Soybean Chlorosis | Agrowon

लोह म्हणजेच फेरस या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता

लोह म्हणजेच फेरस या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे सोयाबीनच्या झाडामध्ये क्लोरोसिस ची लक्षणे निर्माण होतात. क्लोरोसिस ही एक शारीरिक विकृती आहे. लोह या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता सर्वप्रथम कोवळ्या पानांवर दिसून येते.

Soybean Chlorosis | Agrowon

हरितद्रव्याचा अभाव

हरितद्रव्याच्या अभावामुळे पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो आणि शिरा फक्त हिरव्या दिसतात. सोयाबीनचे प्रथम ट्रायफोलिएट पाने हिरवी राहतात कारण लोह हे अन्नद्रव्य अचल म्हणजेच वाहू न शकणारे आहे. 

Soybean Chlorosis | Agrowon

प्रकाश संश्र्लेषण क्रिया मंदावते

लोह रोपट्यात स्थिर होऊन साठविले जाते. म्हणूनच नवीन पानांमध्ये लक्षणे दिसतात. पाने पिवळी पडल्यामुळे हरीतद्रव्य कमी होऊन प्रकाश संश्र्लेषण क्रिया मंदावते, वाढ खुंटते आणि उत्पादनही कमी येते. 

Soybean Chlorosis | Agrowon

लोह आवश्यक

लोह ची कमतरता विशेषत: कमी प्रमाणात निचरा होणाऱ्या चुनखडीयुक्त जमिनीत होते. वनस्पतींमध्ये हिरव्या रंगद्रव्य क्लोरोफिल तयार करण्यासाठी लोह आवश्यक असते.

Soybean Chlorosis | Agrowon

लोहाची कमतरता

बहुतेक जमिनीत वनस्पतींच्या आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात लोह हे सूक्ष्म अन्नद्रव्य असते. बर्‍याचदा जमिनीचा पिएच ७.५ पेक्षा जास्त असतो त्या जमिनीतील लोह फेरस या उपलब्ध स्थितीत न राहता फेरीक स्वरूपात जातो आणि तो पिकांना शोषून घेता येता नाही. त्यामुळे पिकावर लोहाची कमतरता दिसते.

Soybean Chlorosis | Agrowon
cotton | Agrowon
आणखी पाहा...