Farm Ploughing : शेत नांगरणीचे फायदे काय आहेत?

Team Agrowon

बियांचे अंकुरण, पिकाच्या मुळांची वाढ होण्याकरिता जमिन मोकळी व भुसभुशीत असणे आवश्यक असतं. त्यासाठी पिकाच्या पेरणीपुर्वी जमिन चांगली नांगरली केली जाते.

Farm Ploughing | Agrowon

पूर्वी बैल नांगराने तर आता ट्रॅक्टरद्वारे एक ते दीड फूट खोल जमिन नांगरली जाते. उन्हाळ्यात ३५ अंश सेल्सियसपेक्षा अधिक तापमान गेले कि १५ से.मी. खोलपर्यंत जमिनीचे तापमान वाढते. अशा वेळी नांगरट केल्यास जमिनीतील बुरशीजन्य रोग,  किडींच्या सुप्तावस्था, कोष नष्ट होतात. 

Farm Ploughing | Agrowon

उ्हाळ्यातील जमिनीची खोल नांगरट अतीशय महत्वाची आहे. आजकाल शेतीची नांगरट करताना चाप्या निघण्याच प्रमाण वाढल आहे.  नांगरट करताना जर चाप्या निघण्याचं प्रमाण जास्त असेल तर जमिनीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी होत चाललं आहे असं समजाव

Farm Ploughing | Agrowon

चाप्या कमी निघत असतील तर अशा जमिनीचं आरोग्य चांगल आहे असं समजावं. यासाठी जमिनीतील सेंद्रिय कर्बाच प्रमाण तपासण आवश्यक आहे.   

Farm Ploughing | Agrowon

पाऊस पडतो तेंव्हा तो कडक जमिनीवरून पटकन वाहून जातो, ओल खोलपर्यंत जात नाही नांगरलेल्या जमिनीत पाणी खोलवर जिरते,त्यामुळे जमिनीतील ओल टिकून राहते.त्याचा फायदा पिकाच्या वाढीसाठी होतो.

Farm Ploughing | Agrowon

जमीन ओली राहिल्याने सेंद्रिय पदार्थांचे विघटन लवकर होते, त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकांना सहज उपलब्ध होतात.

Farm Ploughing | Agrowon

नांगरटीचा उद्देश साध्य होण्यासाठी, पूर्वीचे पीक काढल्याबरोबर लगेच नांगरट करणे फायद्याचे ठरते. कारण यावेळी जमिनीत ओलावा असल्याने नांगरटीचे काम हलके होते, ढेकळे निघत नाहीत, नांगरट खोलवर होते, पूर्वीच्या पिकाचा पालापाचोळा, काडीकचरा जमिनीत गाडला जातो व जमिनीस सेंद्रिय पदार्थाचा पुरवठा होतो. 

Farm Ploughing | Agrowon
Mango EMI | Agrowon