Team Agrowon
तयारीचा वेळ कमी करून आणि प्रक्रियेचे टप्पे कमी करून ग्राहकांसाठी वाढीव सुविधांची उपलब्धता.
उत्पादनांच्या शाश्वत मागणीचा पुरवठा. उत्पादन सुरक्षा आणि गुणधर्म, जसे की दृश्य स्वरूप आणि चव सुधारणे.
खर्चात कपात, स्पर्धात्मक किंमत मिळते. उप-उत्पादनांचा वापर करण्यास संधी. मूल्यवर्धनाद्वारे उत्पादनाच्या एकूण मूल्यात वाढ.
दृश्य स्वरूप किंवा उपयुक्तता बदलून कच्च्या थंडगार मांसाचे मूल्यवर्धन. मांस टिकवण क्षमता आणि गुणधर्म अनेक एकल किंवा संयोजन युनिट प्रक्रियांद्वारे बदलले जाते.
प्राथमिक प्रक्रियेमध्ये टेंडरायझेशन, ग्राइंडिंग, फ्लेकिंग, गोठवणे आणि पॅकेजिंग यांचा समावेश होतो, त्या पुढील प्रक्रियेमध्ये क्यूरिंग, स्मोकिंग, मॅरीनेट, इमल्सीफायिंग आणि कुकिंग यांचा समावेश होतो.
विकिरण आणि आरोग्यदायी मांस प्रक्रियेद्वारे तयार उत्पादने देखील मूल्यवर्धनांतर्गत येतात.