Swapnil Shinde
इंडिया आघाडीतील सहभागी पक्षांची दोन दिवसांची मुंबईत तिसरी बैठक पार पडली.
मुंबईतील ग्रॅन्ड हयात हाॅटेलमध्ये महाविकास आघाडीमधील शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी (एसपी) आणि काॅंग्रेसच्यावतीने आयोजन केले.
या बैठकीसाठी देशभरातून विविध राज्यातील भाजप विरोधी पक्षांचे देशात मुंबईत दाखल झाले.
यावेळी ढोलताशा आणि तुतारीच्या निनादात पाहुण्यांचे खास मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले.
बैठकीमध्ये लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीला सामोरे जाण्याची रणनिती तयार करण्यात आली.
बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांच्यावतीने पाहुण्यांसाठी स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले.
या भोजनात मराठमोळ्या पदार्थाची रेलचेल होती. हा पाहुणचार पाहून पाहुणे भारावून गेले.