Water level : राज्यभरातील धरणांची काय स्थिती? किती टक्के पाणीसाठा?

Team Agrowon

कोयना धरण

कोयना धरणात ६२.४१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणामध्ये पाण्याची आवक वाढल्याने आज (ता. २७) दुपारी चार वाजता कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहातील दुसरे युनिट सुरू करण्यात येणार आहे.

Dam Water level | Agrowon

राधानगरी धरण

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण 100 % भरल्यामुळे पाच स्वयंचलित दरवाजे बुधवारी (ता. २६) सकाळी दहा वाजता उघडले. धरणातून सध्या ७११२ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.

Dam Water level | Agrowon

उजनी धरण

लोणावळा, खडकवासला, भीमाशंकर धरण साखळीत आणि उजनी धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे उजनीत सध्या ५३.८९ टीएमसी एकूण पाणीसाठा आहे.

Dam Water level | Agrowon

तानसा धरण

मुंबईला पाणीपुरवठा करणारं तानसा धरणात 94.27 टक्के भरले आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Dam Water level | Agrowon

खडकवासला

पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या खडकवासला धरणात ६८.५० टक्के भरले आहे. धरणात १९.९७ टीएमसी इतका पाणी साठा जमा झाला आहे.

water level | Agrowon

भंडारदरा धरण

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे पाणीसाठा वाढत असल्याने भंडारदरा धरणातून विसर्ग वाढवला आहे. ११ टीएमसी क्षमतेचे भंडारदरा धरण ८३ टक्के भरले आहे.

water level | Agrowon
irshalwadi | Agrowon
आणखी पहा..