sandeep Shirguppe
शरीरात जीवनसत्व बी 12 ची कमतरता असेल तर अनेक समस्या जाणवतात, याने शरीरात कोणती लक्षणे दिसतात.
जीवनसत्व बी 12 च्या कमतरतेमुळे हात आणि पायांमध्ये मुंग्या येतात.
तज्ञांच्या मते, त्याच्या कमतरतेमुळे, लोकांना मज्जातंतूशी संबंधित समस्या निर्माण होते किंवा मज्जातंतू खराब होऊ शकते.
जर तुम्हाला चालण्यात किंवा संतुलन राखण्यात अडचण येत असेल तर हे देखील जीवनसत्व बी 12 च्या कमतरता असू शकते.
तुमच्या पायात सूज येत असेल किंवा जळजळ होत असेल तर जीवनसत्व बी 12 च्या कमतरतेचे लक्षण असू शकते.
जीवनसत्व बी12 च्या कमतरतेमुळे सांधेदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे शारिरीक हालचाली करणे अवघड होते.
जीवनसत्व बी 12 च्या कमतरतेमुळे त्वचेचा रंग फिकट किंवा पिवळा होतो. असे लक्षण पायांमध्ये दिसून येते.
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरता कशी भरून काढण्यासाठी अंडी आणि मासे जीवनसत्व बी 12चा चांगला स्त्रोत मानला जातो.