Vasu Baras : गावकऱ्यांच्या साथीने वसुबारस...

Mahesh Gaikwad

गेल्या दोन वर्षांपासून आंबा (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) गावातील शिवसमर्थ कोकण कपिला गोशाळेच्या माध्यमातून कोकण आणि पश्चिम घाटातील नष्ट होत चाललेल्या कोकण कपिला ( कोकण गिड) गोवंश संवर्धनाचे काम सुरू आहे.

Vasu Baras | Amit Gadre

दोन वर्षे लॉकडाऊनमुळे वसुबारस साजरी करता आली नाही. पण यंदा तो मुहूर्त साधला गेला.

Vasu Baras | Amit Gadre

केवळ आपल्या कुटुंबापुरता हा उत्सव साजरा न करता संपूर्ण आंबा ग्रामस्थांनी वसुबारस साजरी करण्यासाठी घरटी आमंत्रण दिले. कारण अजूनही कोकण कपिला गोवंश शेतकऱ्यांच्या पातळीवर देखील दुर्लक्षित आहे.

Vasu Baras | Amit Gadre

यावेळी गोवंशाचे महत्व समजून देण्यासाठी गोशाळेत माहितीपर तक्ते लावले, गोमय आणि गोमूत्रापासून तयार केलेली उत्पादने गावकऱ्यांना दाखविण्यात आली.

Vasu Baras | Amit Gadre

वसुबारस ही एक पुरातन भारतीय संस्कृती आणि परंपरा आहे. त्यानुसार गोशाळा शांती पूजन देखील करण्यात आले.

Vasu Baras | Amit Gadre

गावातील महिला बचत गटांच्या उपक्रमशील सदस्यांच्या हस्ते गोमाता पूजन झाले.

Vasu Baras | Amit Gadre
Vasu Baras | Amit Gadre
cta image | Agrowon
येथे क्लिक करा