Team Agrowon
वर्षभर उपलब्ध असणारे, बिया नसलेले आणि सहज उपलब्ध होणारे फळ म्हणून केळीला ओळखले जाते.
केळीचा साठवण कालावधी कमी असल्यामुळे प्रक्रिया करून केळीचा साठवण कालावधी वाढविणे शक्य होते.
केळी हे उत्तम शक्तिवर्धक, पचनास हलके व औषधी गुणधर्मयुक्त फळ आहे.
केळीपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. या प्रक्रियायुक्त पदार्थांना बाजारात चांगली मागणी आहे.
केळीची पावडर मिल्क शेक आणि बेबी फूडमध्ये वापरली जाते.
वेगवेगळ्या प्रकारचे केक आणि बिस्कीट बनविण्यासाठी देखील केळी पावडरचा वापर केला जातो.
चिप्स बनवण्यासाठी कच्च्या केळीचा वापर केला जातो.