Mahesh Gaikwad
पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करणे आवश्यक असते.
पावसाळ्यापूर्वी लसीकरण न केल्यास जनावरांना संसर्गजन्य रोगांची लागण होण्याची शक्यता असते.
लसीकरण न केल्यास जनावरांना लाळ-खुरकूत, घटसर्प, फऱ्या, आंत्रविषार यासारख्या आजारांमुळे आजारी पडतात.
तसेच शेळयातील प्लेग, ब्रुसेलोसिस, गोचिड ताप या आजारांमुळेही जनावरे आजारी पडतात.
सध्या लम्पी स्किनचा प्रादुर्भाव पुन्हा वाढताना दिसत आहे. त्यामुळे जनावरांचे लम्पीचे लसीकरण करणेही आवश्यक आहे.
घातक आजारापासून जनावरांचे संरक्षण होण्यासाठी जनावरांचे वेळापत्रकानूसार लसीकरणे होणे गरजेचे आहे.
जनावरे आजारी पडल्यामुळे दूध उत्पादनात घट, गर्भपात, दोन वेतातील अंतर वाढणे, वासरांची वाढ कमी होणे, इतर आजारांचा प्रादुर्भाव वाढतो.