Mahesh Gaikwad
देशभरात खरिप हंगामातील शेतीच्या कामांची सुरूवात झाली आहे. खरिपातील पेरण्यासांठी शेतकऱ्यांचीही लगबग सुरू आहे.
अशातच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी उत्तरकाशीमध्ये नाचणी पिकाची पेरणी केली आहे.
राज्यातील आपल्या दौऱ्यादरम्यान उत्तरकाशीतील सिरोर गावामध्ये मुख्यमंत्री धामी नाचणीची पेरणी करताना दिसले.
तसेच यावेळी मुख्यमंत्री धामी यांनी शेतात पॉवर विडर चालवत शेताची मशातही केली.
यानंतर धामी यांच्याहस्ते शेतकरी महिलांना नाचणीच्या बियाण्यांचे वाटप करण्यात आले.
२०२३ हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. केंद्र सरकारकडून भरडधान्याचा प्रचार आणि प्रसार केला जात आहे.
उत्तराखंडमध्ये नाचणी आहारातील प्रमुख घटक असून राज्यातील गढवाल आणि कुमाऊ भागात मोठ्या प्रमाणात नाचणीचे पीक घेतले जाते.
धामी यांनी आपल्या दौऱ्यादरम्यान स्थानिकांशी संवाद साधत सरकारद्वारे राबविल्या जाणाऱ्या कल्याणकारी योजनांचा आढावा घेतला.