Team Agrowon
विविध घटक पदार्थांच्या गुणधर्मामुळे दुधाला विशिष्ट रंग, चव, वास, प्राप्त होते.
दुधापासून बनवण्यात येणाऱ्या विविध दुग्धजन्य पदार्थांची (Dairy Product) गुणवत्ता दुधातील घटक पदार्थावर अवलंबून असते.
दुधातील सर्व घटक पदार्थांचे प्रमाण नेहमी एकसारखे नसते. अनेक कारणांनी घटक पदार्थ बदलतात.
पर्यायाने दुधाचे पोषण मूल्य आणि बाजारभाव देखील बदलतो.
दुधामध्ये ८० ते ९० टक्के पाणी असते. जनावराच्या दुधात सरासरी ८७ टक्के पाणी असते. पाण्याचे प्रमाण जात, वय, आरोग्य अशा अनेक घटकांमुळे बदलते.
दुधातील विविध मुख्य व गौण घटकांसाठी पाणी हे द्रावकाचे काम करते. त्यांचे वहन करताना माध्यम म्हणून कार्य करते. पाण्यामुळे दुधातील घटकांची पाचकता वाढते.
दुधात स्निग्धपदार्थ साधारण ३ ते ८ मायक्रोमीटर व्यासाइतक्या सूक्ष्म कणांच्या रूपात असतात.