Team Agrowon
गवार हे अत्यंत महत्त्वाचे शेंगावर्गीय पीक आहे. गवार डिंक प्रक्रियेमधील गवार मील हे उपउत्पादन आहे. यामध्ये प्रति किलोग्रॅम सुमारे ४९० ग्रॅम प्रथिने असतात.
उच्च प्रथिने असूनही, गवार मील हे कोंबडी खाद्यात व्यावसायिक स्तरावर फारसे वापरले जात नाही.
गवार मील एक उत्कृष्ट अत्यावश्यक अमिनो आम्लाचा स्रोत आहे. यामध्ये लाइसिन, ट्रिप्टोफॅन, आयसोल्युसीन व्हॅलिन आणि फेनिलॅलानिनची उच्च पातळी असते.
गवार मीलमधील अमिनो आम्लाचे प्रमाण हे कोंबड्यांसाठी उपयुक्त प्रथिनांचा स्त्रोत आहे.
विविध अभ्यासातून असे दिसून आले आहे की, कोंबडी खाद्यामध्ये गवार मील २.५ टक्के आणि ५ टक्के प्रमाणात सामावेश केला असेल तर ब्रॉयलरच्या वाढीच्या कार्यक्षमतेवर कोणताही नकारात्मक प्रभाव पडत नाही.
गवार मील जर ७.५ टक्के आणि १० टक्क्यांपेक्षा जास्त वापरले तर कोंबड्यांच्या वाढीवर आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
गवार मीलमधील उच्च प्रथिने आणि उत्तम अमिनो आम्लाचे प्रमाण हे कोंबडीच्या वाढीची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करते. तसेच रोगप्रतिकारक क्षमता सुधारण्यास मदत करते.