Anuradha Vipat
जर तुम्हाला युरिक ॲसिडचा त्रास होत असेल, तर आहारात बदल करणे हा तो नियंत्रित ठेवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे.
दिवसभरात किमान ३-४ लिटर पाणी प्या. यामुळे किडनीद्वारे युरिक ॲसिड लघवीवाटे बाहेर निघून जाते.
लिंबू, संत्री आणि मोसंबीचा आहारात समावेश करा. लिंबू पाणी युरिक ॲसिड कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे.
ओट्स, दलिया, ब्राऊन राईस आणि हिरव्या पालेभाज्या खा. फायबर रक्तातील युरिक ॲसिड शोषून घेते.
सफरचंदात असलेले मॅलिक ॲसिड युरिक ॲसिडला न्यूट्रलाईज करते. चेरी रक्तातील सूज कमी करण्यास मदत करतात.
थंड दूध किंवा ताक प्या. यातील प्रथिने शरीरातील युरिक ॲसिडची पातळी कमी करतात.
मटण किंवा कलेजी खाणे पूर्णपणे टाळा.