Maize Market: ओल्या मक्याला दोनशे रूपये कमी दर

Team Agrowon

सध्या मक्याची काढणी सुरू आहे. पण शेतकरी काढणी केल्या केल्या ओला मिका विकत आहेत. त्यामुळे रेट कमी बसतोय. शेतकऱ्यांनी ओला मका विकू नये, असा सल्ला जाणकारांनी दिलाय.

Maize Market | Agrowon

व्यापारी सध्या २२ टक्के मॉईश्चरचा ओला मका प्रति क्विंटल १६०० रूपयांनी खरेदी करू लागलेत.

Maize Market | Agrowon

याच मक्यातलं मॉईश्चर १४ टक्के झालं तर वजन साधारण दहा टक्के घटेल. म्हणजे उरतो ९० किलो मका. त्याचा भाव दोन हजार रुपये आहे.

Maize Market | Agrowon

थोडक्यात दोनशे रूपयांचा फरक बसतोय. म्हणजे काय शेतकऱ्यांनी हाच मका कोरडा करून आणला तर त्यांना प्रतिक्विंटल दोनशे रुपयांचा फायदा होईल.

Maize Market | Agrowon

मक्याचे ताट कडकडीत वाळल्यानंतरच कापणी करा. पुढे उन्हांत कणसे वाळू द्या.

Maize Market | Agrowon

नैसर्गिकरित्या मॉईश्चर १४ टक्क्यापर्यंत कमी होते, अशी माहिती या जाणकारांनी दिली.

Maize Market | Agrowon
cta image | Agrowon
क्लिक करा