Anil Jadhao
देशातील शेतकऱ्यांची तूर सध्या फुलोरा आणि शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. मात्रदुसरीकडे बाजारात मागील काही महिन्यांपासून मोठी उलथापालथ सुरु आहे.
देशात सध्या आफ्रिकी देशांमधून कमी दरात तुरीची आयात वाढत आहे. या देशांमध्ये सध्या नव्या तुरीची आवक सुरु झाली. ही तूर लगेच भारतात पाठवली जात असल्याचं आयातदारांनी सांगितलं. त्यामुळं देशातील तुरीच्या तेजीला ब्रक लागला.
देशातील तुरीचे दर एका भावपातळीवर स्थिर आहेत. सध्या म्यानमारच्या तुरीपेक्षा आफ्रिकेतून आयात केलेली तूर स्वस्त आहे. त्यामुळं यापासून निर्मित डाळीचे दरही कमी आहेत. याचाही दबाव देशातील तुरीच्या बाजारावर येतोय.
सरकार म्यानमारमधून आयात तुरीची ७ हजार ९५० रुपये प्रतिक्विंटलने खरेदी करत आहे. हा दर सध्या सरकारकडे उपलब्ध असलेल्या साठ्याच्या तुलनेत खुपच जास्त आहे.
आफ्रिकेतून आयात होणाऱ्या तुरीला ५ हजार ९८० रुपये दर दिला जात आहे. सरकारने आत्तापर्यंत १२ हजार टन आयात तूर खरेदी केली आहे.
देशात यंदा तूर उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळं तूर सरासरी ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान विकली जाऊ शकते, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.