Anuradha Vipat
तुळजापूरच्या भवानी देवीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवण्यामागे अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक कथा तसेच धार्मिक परंपरा आहेत.
भवानी माता ही दुर्गेचेच एक रूप आहे. देवीचे हे रूप महिषासुर मर्दिनी म्हणून ओळखले जाते.
भवानी माता हे देवीचे उग्र, रानभूल आणि शक्तीचे स्वरूप मानले जाते.
उग्र देवतांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांच्या शक्तीचे प्रतीक म्हणून मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो.
नवरात्रीच्या काळात आणि दसऱ्याच्या दिवशी तुळजाभवानी मंदिरात बळी देण्याची जुनी प्रथा आहे.
दसऱ्याच्या दिवशी काळभैरवनाथाला मांसाहाराचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे
तुळजाभवानी ही अनेक कुटुंबांची कुलस्वामीनी आहे. अनेक कुळांमध्ये परंपरेनुसार देवीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो.