Eye Infection Treatment : डोळे आल्यावर आयुर्वेदिक उपचार करा आणि मिळवा आराम

sandeep Shirguppe

डोळ्याची साथ आलीय

राज्यात सध्या डोळ्याच्या संसर्गजन्य रोगाची जोरदार साथ सुरू आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर या महत्वाच्या भागात डोळे आल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात आढळून आल्या आहेत.

Eye Infection Treatment | agrowon

पिंक आय

डोळे येणे या आजारास इंग्रजीमध्ये Pink Eye किंवा Conjunctivitis (कॉन्जुक्टीव्हिटीज) असे म्हणतात. डोळ्यातील पांढरा भाग आणि पापणी खालील भागामध्ये एक पारदर्शक पडदा असतो त्यालाच कान्जुक्टीव्हा असे म्हणतात.

Eye Infection Treatment | agrowon

लक्षणे

डोळ्यात खुपल्यासारखे होणे, लालसर किंवा गुलाबी, जळजळ होणे, डोळ्यातून सुरुवातीला पाणी व त्यानंतर चिकट घाण येणे, डोळ्यांच्या पापण्या चिकटणे असे अनेक प्रकार घडतात.

Eye Infection Treatment | agrowon

काय करावे

डोळ्याची जळजळ होत असल्यास थंड पाण्याने डोळे स्वच्छ धुवावेत आणि डॉक्टरांनी दिलेली ड्रॉप्स डोळ्यात घालावेत.

Eye Infection Treatment | agrowon

गॉगलचा वापर करा

डोळे आले असल्यास स्वच्छ आणि दर्जेदार गॉगल घालावा. यामुळे धूळ, कचरा, वारा डोळ्यात जात नाही तसेच उजेडाचा त्रासही होत नाही.

Eye Infection Treatment | agrowon

घरगुती उपाय

डोळे आल्यानंतर सुजलेल्या पापण्यांना एरंडेल तेल एखादे थेंब लावणे यामुळे आराम पडण्यास मदत होते व डोळे येण्याचा त्रास कमी होतो. हा आयुर्वेदिक पर्याय या त्रासावर उपयोगी पडतो.

Eye Infection Treatment | agrowon

उपचार पद्धती

डोळे येणे हा त्रास दोन ते तीन दिवसात कमी होत असतो. यावरील उपचारासाठी आपले डॉक्टर डोळ्यात घालण्यासाठी अँटीबायोटिक ड्रॉप्स देतात. याशिवाय सूज आणि वेदना कमी करण्यासाठीही औषधे देऊ शकतात.

Eye Infection Treatment | agrowon

गुलाब पाण्यामुळे आराम

गुलाब पाण्याने डोळ्यांना आराम मिळतो. यामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि एँटीसेप्टिक गुण आहे ज्यामुळे डोळे साफ होतात आणि चिकटपणा देखील दूर होतो. थंड गुलाब पाण्याचे दोन थेंब काही मिनिटांत डोळ्यांचे आजार दूर होतात.

Eye Infection Treatment | agrowon

कापराचा वापर करावा

डोळे आल्यावर आपण कापूर जाळून धूरी घ्यावी. यामुळे डोळ्यातील घाण बाहेर पडण्यास मदत होते. तसेच कापराचा वास घ्यावा यामुळे संसर्ग दूर होण्यास मदत होते.

Eye Infection Treatment | agrowon
water level | agrowon