Oxygen Trees : रात्रीच्या वेळीही ऑक्सिजन देणारी झाडं

Team Agrowon

कोरोना महामारी

कोरोना महामारीमध्ये खऱ्या अर्थाने ऑक्सिजनचं महत्त्व समजलं. कारण कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर शरिराती ऑक्सिजनची पातळी खालावल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला.

Trees Gives Oxygen at Night | Agrowon

रात्री ऑक्सिजन देणारी झाडे

झाडे माणसाला जगण्यासाठी ऑक्सिजन देतात. सर्वसाधारणपणे झाडे रात्रीच्यावेळी वातावरणात कार्बनडाय ऑक्साईड सोडतात. पण काही झाडं अशी आहेत ती रात्रीच्यावेळीही आपल्याला ऑक्सिजन देत असतात.

Trees Gives Oxygen at Night | Agrowon

कोरफड

ही एक अशी वनस्पती आहे, जी कुठल्या न घरात लावलेली आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याच सौंदर्य प्रसाधनांमध्ये कोरफड वापरली जाते. कोरफड औषधी गुणधर्मांसाठी प्रसिध्द आहेच पण कोरफड ही वनस्पती रात्रीच्या वेळीही ऑक्सिजन देते.

Trees Gives Oxygen at Night | Agrowon

पिंपळ

हिंदू आणि बौध्द धर्मामध्ये पिंपळ वृक्षाला अनन्य साधारण महत्त्व आहे. पिंपळामधील औषधी गुणधर्मांमुळे दमा, बध्दकोष्टासारख्या आजारांवर गुणकारी मानले जाते. शिवाय पिंपळ हा असा वृक्ष आहे जो रात्रीच्या वेळीही ऑक्सिजन देत असतो.

Trees Gives Oxygen at Night | Agrowon

कडुलिंब

आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानला जाणारा कडुलिंबदेखील रात्रीच्या वेळी ऑक्सिजन देतो. शरिरातील रक्तशुध्दिकरणसाठी कडुलिंब अत्यंत गुणकारी आहे. तसेच अनेक आरोग्याच्या तक्रारींवर कडुलिंबाच्या पाल्याचा रस घेतला जातो.

Trees Gives Oxygen at Night | Agrowon

तुळस

भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये तुळशीला अनन्य साधारण महत्त्व आहे. अनेक पुजाविधींमध्ये तुळशीचे पूजन केले जाते. तसेच तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. सर्दी, खोकल्याच्या आजारावर तुळस अत्यंत गुणकारी आहे. औषधी गुणधर्मांसह तुळस रात्रीच्या वेळी ऑक्सिजन देण्याचं काम करते.

Trees Gives Oxygen at Night | Agrowon

मनी प्लांट

अनेक घरांमध्ये मनी प्लांट ही वनस्पती कुंडीमध्ये लावलेली आढळते. हवा शुध्दीकरणासाठी घरात ही वनस्पती लावली जाते. तसेच ही वनस्पती रात्रीच्यावेळी ऑक्सिजन देते.

Trees Gives Oxygen at Night | Agrowon

स्नेक प्लांट

सरळ पाने असलेल्या या वनस्पतीला स्नेक म्हणजेच साप वनस्पती असे म्हणतात. तीन फुटांपर्यंत वाढ असलेली ही वनस्पती घरात, परबागेत कुंडीमध्ये लावतात.

Trees Gives Oxygen at Night | Agrowon
Monsoon Trip Maharashtra | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....