Team Agrowon
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम जोमात सुरू आहे. हे काम येत्या वर्षभरात पूर्ण होईल, असे सांगण्यात येत आहे
संत तुकाराम महाराज पालखीची दौंड, बारामती आणि इंदापूर तालुक्यातून जाते. तेथील महामार्गाचे काम अंतिम टप्प्यावर आहे
राष्ट्रीय महामार्ग 965G च्या बारामती इंदापूर क्षेत्रात मोडणाऱ्या संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर आपण फेब्रुवारी आणि मार्च 2022 मध्ये वृक्षारोपण प्रकल्प हाती घेतला होता.
या प्रकल्पामुळे केवळ पर्यावरणाचं संवर्धनच झालं नाही तर या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या झाडांमुळे सावलीचा गारवा अनुभव घेता येत आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितलं आहे की, या प्रकल्पा अंतर्गत १०२५ वटवृक्ष या महामार्गाच्या कडेने लावले होते.
या रोपण केलेल्या वृक्षांपैकी 870 वृक्षांची चांगली वाढ झाली आहे
दरवर्षी ओराड दिसणारा महामार्ग आता हिरवागार दिसत आहे
या वृक्षामुळे पालखी मार्गाची शोभादेखील वाढली आहे.