Team Agrowon
अनेकदा गायी-म्हशींना इजा झाल्यामुळे जखम होण्याचा धोका असतो. अशी जमख चिघळल्यामुळे त्यावर माशा बसून कीडे पडतात.
जनावरांच्या जखमेवर माशी विष्ठा करते. माशीच्या विष्ठेमुळे जखमेवर कीडे तयार होतात.
तसेच जनावरांच्या जखमेमध्ये माती आणि घाणीमुळेही कीडे पडतात. अशा परिस्थितीत वेळीच उपचार न केल्यास जनावर दगावण्याचा धोका असतो.
जनावरांच्या जखमेत कीडे पडल्यास पशुपालकांनी तातडीने उपचार करावे. सर्वप्रथम जनावराची जखम जंतुनाशकाने साफ करून घ्यावी.
जर जखम झालेल्या भागावर पट्टी बांधणे शक्य असल्यास जखमेवर पट्टी बांधावी.
जनावरांना झालेल्या जखमांवर वेळीच प्रथमोपचार केल्यास जखम चिघळण्याची शक्यता कमी असते.
जनावरांच्या जखमेवर पशुचिकित्सकाकडून योग्य उपचार करणे आवश्यक असते. वेळीच उपचार न केल्यास जनावरं दगावू शकते.