टीम ॲग्रोवन
जानेवारी ते सप्टेंबर २०२२ दरम्यान गतवर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत विश्रांतीसाठीच्या पर्यटनामध्ये ६२ टक्के वाढ झाली आहे.
‘ओयो’ने केलेल्या जागतिक पर्यटन दिन अहवालात त्याबद्दल माहिती देण्यात आली आहे.देशांतर्गत पर्यटनाला चालना मिळाली आहे.
जयपूर व गोवा ही भारतातील लोकप्रिय पर्यटनस्थळे म्हणून आघाडीवर आहेत.
कोची, वाराणसी आणि विशाखापट्टणमही भारतीय पर्यटकांमध्ये अव्वल क्रमांकाची स्थळे म्हणून उदयास आली आहेत.
समुद्रकिनारा असलेल्या ठिकाणाकडे पर्यटकांचा अधिक कल असल्याचे दिसून येते.
२०२२ च्या पहिल्या दोन तिमाहीत दिल्ली, हैदराबाद, बेंगळुरू, कोलकाता आणि चेन्नई भारतातील अव्वल व्यावसायिक स्थान म्हणून अग्रस्थानी आहे.
विश्रांतीच्या ठिकाणांसाठी जयपूर, गोवा, नागपूर, डेहराडून आणि वाराणसी यांना सणासुदीच्या काळात मागणी वाढेल.
१०० पर्यटनस्थळांच्या विश्लेषणानुसार जवळपास २५ टक्क्यांसह बहुतेक हिल स्टेशन ऑक्टोबर-डिसेंबर २०२२ दरम्यान सर्वाधिक पसंतीची ठिकाणे असण्याचा अंदाज आहे.
२० टक्के हेरिटेज शहरे आणि जवळपास १० टक्के समुद्रकिनाऱ्यांची ठिकाणांनाही पसंती मिळेल. प्रयागराज, रायपूर, पुरी, नाशिक, बरेली इत्यादींसारखी स्थळेही यादीत समाविष्ट आहेत.