Biggest Dam In India : भारतातील १० महाकाय धरणं

Team Agrowon

टिहरी धरण

उत्तराखंडमधील टिहरी हे भारतातील मोठ्या धरणांपैकी एक धरण आहे. भागीरथी नदीवर हे धरण बांधण्यात आलं आहे. या धरणाची साठवण क्षमता ३५४0 एमसीएम (मिलीयन क्यूबिक मीटर) एवढी आहे. देशात सर्वात उंचीवर असलेलं धरण म्हणून या धरणाची ख्याती आहे.

Tehri Dam | Agrowon

भाक्रा धरण

हिमाचल प्रदेशमध्ये बांधण्यात आलेल्या भाक्रा धरण हेही देशातील सर्वात मोठं धरण आहे. हे धरण सतलज नदीवर बांधलं असून हे धरण गुरू गोविंदसिंग यांच्या नावाने ओळखलं जातं.

Bhakra Dam | Agrowon

सरदार सरोवर

गुरातमध्ये नर्मदा नदीवर बांधण्यात आलेलं सरदार सरोवर धरणाचं भूमिपूजन माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याहस्ते झालं होतं. भूमिपूजनानंतर धरण पूर्ण होण्यासाठी तब्बल ५६ वर्षांचा कालवधी लागला.

Sardar Sarovar | Agrowon

हिराकुड धरण

ओडिशामधील महानदी या नदीवर हे धरण बांधण्यात आलं आहे. या धरणाची उंची ६०.९६ मीटर असून लांबी ४.८ किलोमीटर इतकी आहे. या धरणाची साठवण क्षमता ५८९६ एमसीएम इतकी आहे.

Hirakud Dam | Agrowon

नागार्जुन सागर

हे धरण महाराष्ट्रातून वाहणाऱ्या कृष्णा नदीवर तेलंगणामध्ये बांधण्यात आलं आहे. भारतातील सर्वांत मोठा अन् जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मानवनिर्मित जलाशय अशीही या धरणाची ख्याती आहे. या धरणाची साठवण क्षमता ४५० टीएमसी इतकी आहे.

Nagarjun Sagar | Agrowon

कोयना धरण

कोयना धरण कोयना नदीवर बांधण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुत्यात बांधण्यात आलेलं कोयना हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण आहे. या धरणाची साठवण क्षमता २९८०.६९ एमसीएम इतकी आहे.

Koyna Dam | Agrowon

इंदिरा सागर

इंदिरा सागर हे धरण मध्यप्रदेशमध्ये बांधण्यात आलेलं देशातील मोठ्या धरणांपैकी एक धरण आहे. हे धरण नर्मदा नदीवर बांधण्यात आलं आहे. या धरणाची साठवण क्षमचा सुमारे १२२२० एमसीएम एवढी आहे.

Indira Sagar | Agrowon

रिंहद धरण

उत्तरप्रदेश आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांच्या सीमेवर रिहंद धरण बांधण्यात आलं आहे. रिहंद नदीवर बांधलेल्या या धरणाची साठवण क्षमता १०.६ बीसीएम (बिलीयन क्यूबुत मीटर) इतकी आहे.

Rihand Dam | Agrowon

मेत्तूर धरण

तामिळनाडू राज्यातील मेत्तूर हे धरण कावेरी नदीवर बांधण्यात आलं आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता ९३.४७ टीएमसी एवढी आहे. ३७ मीटर उंच तर १७०० मीटर लांबीचे हे धरण आहे.

Mettur Dam | Agrowon

कृष्ण राजा सागर

हे धरण कर्नाटकमध्ये १९३२ साली निर्माण करण्यात आलं. कावेरी नदीवर बांधण्यात आलेल्या या धरणाची साठवण क्षमता ४९.४५ टीएमसी एवढी आहे.

Krishna Raja Sagar | Agrowon
Palasnath Temple | Agrowon