Anuradha Vipat
आज तुमचा मनोबल आणि आत्मविश्वास वाढवणारी एखादी चांगली घटना घडेल. खूप जास्त विचार करून स्वतःवर ताण आणू नका.
आज नशिबाची पूर्ण साथ लाभेल . हाती घेतलेली कामे यशस्वीपणे पूर्ण होतील.
आज तुमचे आरोग्य उत्तम राहील आणि आर्थिक निर्णय मार्गी लागतील. जुनी रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.
नोकरीच्या ठिकाणी कर्मचारी वर्गाचे उत्तम सहकार्य लाभेल. दुपारनंतर तुमची महत्त्वाची कामे वेगाने मार्गी लागतील.
आर्थिक क्षेत्रात धाडसी निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे.
राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना मोठे यश लाभेल. जुन्या चिंता सोडून नव्या संधींचे स्वागत करा.
आज तुमची जिद्द आणि चिकाटी वाढेल. कठीण प्रसंगात नातेवाईक आणि मित्रांचे सहकार्य लाभेल.
आज काहींना आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवू शकतात, त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या.
आज तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक कार्यात सहभागी झाल्यामुळे नवीन ओळखी होतील.
आज कामाच्या व्यस्ततेमुळे थकवा जाणवू शकतो आणि कुटुंबासाठी कमी वेळ मिळेल.
आज परिस्थिती तुमच्या नियंत्रणात असेल. कुटुंबातील प्रियजनांचा उत्तम सहवास लाभेल आणि मन प्रसन्न राहील.
आज तुम्हाला शत्रुंचा कोणताही त्रास होणार नाही. अचानक धनलाभ झाल्यामुळे तुमची आर्थिक बाजू सुधारेल.