Team Agrowon
टोमॅटो महागल्याने सध्या सामान्याचं कंबरडं मोडलं आहे. यामुळे शेतकऱ्यांना देखील जास्त फायदा झाल असं देखील नाही.
त्यामुळे टोमॅटो घेतला तरी तो जास्त वेळ टिकून राहण्याची खात्री नाही. इतका महाग टोमॅटो खरेदी करुन तो खराब झाल्यास नुकसान होत.
त्यामुळे पुढील टिप्स आणि ट्रिक्स वापरुन तुम्ही टोमॅटो खराब होण्यापासून वाचवू शकता.
टोमॅटोचा हिरवा देठ काढून टाका. देठ काढल्यानंतर टोमॅटो अशाप्रकारे ठेवा की देठाचा भाग खाली आणि लाल भाग वर राहील.
अनेकजण टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवतात पण ते ठेवताना कागदाच्या पिशवीचा किंवा प्लास्टिकच्या पिशवीचा उपयोग करा.
असे केल्यास टोमॅटोची चव आणि पोत योग्य राहण्यास मदत होते. यामुळे जेवणात देखील चव येईल.
बाजारात गेल्यानंतर टोमॅटो खरेदी करताना पिकलेल्या लाल रंगाच्या ऐवजी न पिकलेले हिरवे टोमॅचो विकत घ्या. हिरवे टोमॅटो खोलीच्या तपमानावर जवळजवळ एक आठवडा ताजे राहू शकतात.