Team Agrowon
हरभरा पौष्टिक असल्याने अशक्तपणामध्ये जरूर खावा. कोवळे हरभरे भाजून खावेत.
हरभऱ्याच्या डाळीचे पीठ, साय, दूध, हळद, मध हे मिश्रण चेहऱ्याला लेप स्वरूपात लावून वाळले की काढून टाकावे. यामुळे त्वचेचा रंग आणि पोत सुधारतो.
बऱ्याचदा सर्दी वारंवार होणे, घशामध्ये कफाचा चिकटा असणे, घसा खाकरावा लागणे अशा तक्रारी असतात. अशा वेळी फुटाणे पाच-सहा प्रमाणात दोन-तीन वेळा सेवन करावेत. पण त्यावर पाणी पिऊ नये.
रात्री कफाचा खोकला असल्यास फुटाणे सेवन करून झोपल्यास कफ कमी होतो. घसा मोकळा होतो. अर्थातच कफ कमी करण्यासाठी औषधे जोडीला हवीतच.
हरभरे भिजत घालून त्याला मोड आणून सेवन केल्यास शक्तिवर्धक म्हणून काम करतात.
सर्दी खूप झाल्यास, नाक सारखे वाहत असल्यास रोज फुटाणे सेवन करावेत. त्याचा फायदा होतो.
हरभरा औषधी असला तरी पचायला जड असतो. विशेषतः पीठ, भिजवलेली डाळ या गोष्टींनी पोट जड होते. म्हणून पचनशक्ती उत्तम असणाऱ्या लोकांनी हरभरा सेवन केल्यास शक्तिवर्धक म्हणून काम होते. हे महत्त्वाचे जरूर लक्षात ठेवावे.