World Agri Tourism Day : महाराष्ट्रात अशी रोवली कृषी पर्यटनाची मुहूर्तमेढ

Team Agrowon

कृषी पर्यटन

भारतात सर्वात पहिल्यांदा १९७० मध्ये बारामती येथे ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ पद्मश्री आप्पासोहाब पवार यांनी कृषी पर्यटन विकास महामंडळाची स्थापना केली.

World Agri Tourism Day | Agrowon

कृषी पर्यटनाला चालना

त्यानंतर महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने २००५ नंतर कृषी पर्यटनाला चालना मिळाली.

World Agri Tourism Day | Agrowon

ग्रामीण महाराष्ट्राचा विकास

कृषी पर्यटनातून ग्रामीण भागाचा आणि त्यातूनच महाराष्ट्राच्या विकासाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले.

World Agri Tourism Day | Agrowon

मार्टची स्थापना

त्यानुसार, २००८ मध्ये महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघाची (मार्ट) स्थापना करण्यात आली. २०१० मध्ये राज्यात ८० कृषी पर्यटन केंद्र कार्यरत होती.

World Agri Tourism Day | Agrowon

ग्रामीण विकास

कृषी पर्यटनांच्या माध्यमातून ग्रामीण निसर्ग सौंदर्य व संस्कृती संवर्धनाच्या दृष्टीने चालना देण्यात आली.

World Agri Tourism Day | Agrowon

कृषी पर्यटन केंद्र

२०१३ मध्ये राज्यात १२५ केंद्रे होती ती वाढून २०१९ मध्ये ही संख्या ३०० च्यावर गेली असून आजघडीला महाराष्ट्रात ४७५ नोंदणीकृत कृषी पर्यटन केंद्रे आहेत.

World Agri Tourism Day | Agrowon

कृषी पर्यटन धोरण

महाराष्ट्राचा भौगोलिक विचार करून कृषी पर्यटनाचे सहा विभाग करण्यात आले आहेत. यामध्ये पुणे, कोकण, नाशिक, छ. संभाजीनगर, अमरावती व नागपूर यांचा समावेश आहे.

World Agri Tourism Day | Agrowon

महिला कृषी पर्यटन

भारतात महिला कृषी पर्यटन सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आणि पुणे हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.

World Agri Tourism Day | Agrowon
Rohit Pawar | Agrowon