Anuradha Vipat
वास्तू शास्त्रानुसार महिलांनी रात्री झोपण्यापूर्वी केलेल्या काही छोट्या चुकांमुळे घरात नकारात्मकता येऊ शकते.
रात्री जेवण झाल्यानंतर स्वयंपाकघर आणि गॅस ओटा पूर्णपणे स्वच्छ करूनच झोपा.
सिंकमध्ये रात्रीची खरकटी भांडी तशीच ठेवून झोपू नका. यामुळे घरात 'अन्नपूर्णा देवी'चा अपमान होतो.
झोपताना नेहमी डोके दक्षिण किंवा पूर्व दिशेला आणि पाय उत्तर किंवा पश्चिम दिशेला असावेत.
बेडच्या समोर किंवा अशा ठिकाणी आरसा नसावा, जिथे झोपलेल्या शरीराचे प्रतिबिंब दिसेल.
बेडवर बसून कधीही जेवण करू नका. यामुळे राहूचा दोष लागतो आणि वाईट स्वप्ने पडतात.
घराच्या मुख्य दरवाजाजवळ रात्री पूर्ण अंधार ठेवू नका. तिथे एक छोटा दिवा नेहमी चालू ठेवावा